Pages

Sunday, November 17, 2013

साले हे मित्र असतात बाकी मस्त

  • "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"
  • "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"
  • हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • "नडला कि फोडला"असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!
  • निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!
  • तुमचे प्रेमप्रकरणअख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!
  • उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • शेवटच्या बेन्चवरच्याकमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!
  • Break-up नंतर"अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
  • तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी,
  • दुसर्यासमोरत्यांच्या-तोंडून तुमचच नाव गाजतं!
  • पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
  • मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
  • खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा!"